नाना पाटेकरांचा देखील अमोल कोल्हेंना पाठिंबा म्हणाले…

मुंबई : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत. या त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे.

नथुराम गोडसेची भूमिका कोल्हे यांनी साकारल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘अमोल कोल्हेंच्या नथुरामला विरोध नाही’ असे म्हटले. यानंतर आता जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पाटेकर म्हणाले कि, 30 वर्षापूर्वी मी देखील गोडसेचा रोल केला आहे. ती फिल्म इंग्लिश होती. याचा अर्थ मी गोडसे यांचे समर्थन असा होत नाही. अमोल कोल्हेही एक कलाकार आहे . कलाकार म्हणून हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या