Nana Patole | “आईला भेटाया गेले की नरेंद्र मोदी कॅमेराकडे बघून फोटो काढतात, पण राहुल गांधी…”, नाना पटोलेंचा पंतप्रधानांना टोला

Nana Patole | मुंबई : आपल्या व्यस्त दिनक्रमातून अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांच्या आईला भेटायला जातात. यावेळी त्यांनी अनेक वेळा त्यांचे फोटो शेअर केले आहेत. यावरुन काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं देखील कौतुक केलं आहे. यापुर्वी देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी नरेंद्र मोदी यांच्या आईसोबतच्या फोटोवर टीका केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आईला भेटण्यासाठी जातात आणि कॅमेऱ्याकडे पाहून फोटो काढतात. राहुल गांधी मात्र आईच्या बुटाची लेस बांधताना पायाकडेच पाहतात, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

बुलढाणा येथे इथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. नाना पटोले सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत. 18 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यात येणार असून त्या दिवशीच शेगावला जाहीर सभाही होणार आहे. या सभेला लाखोंची उपस्थिती असावी, यासाठी संपूर्ण कांग्रेसची यंत्रणा कामाला लागली आहे.

दरम्यान, केंद्राने जीएसटीच्या रुपानं पैसे जमा केले आहे. त्यात अदानीचे 12 हजार कोटींचं कर्ज माफ केलं. हा आपला पैसा आहे, आपल्या पैशात हे कर्ज माफ केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आगमन सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.