Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Nana Patole | मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे. ‘आम्ही 48 जागा लढविण्यासाठी मूर्ख आहोत का?’ असा सवाल उपस्थित केल्याने या मुद्द्यावरुन वाद चांगलाच पेटणार आहे. शिंदे गटातील नेते, आमदारांकडून प्रतिक्रिया येत असतानाच आता काँग्रेसने या वादात उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या जागावाटपाच्या वादावर वक्तव्य केलं आहे.
“आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”
“आता तर कुठं सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे चागलं व्हावं, अशीच आमची सदिच्छा आहे. पण भाजप त्यांचं काय करेल हे आता सांगता येणार नाही. जे बावनकुळेंच्या पोटत होतं, तेच त्यांच्या ओठातून निघालं आहे. भाजपा हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. भाजपाकडून सातत्याने लोकांची दिशाभूल करण्यात येते. भाजपाबद्दल आता लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
Nana Patole Criticize BJP
“त्यांनी एकनाथ शिंदे यांना सतर्क राहण्याच सल्लाही दिला. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलची खोटी बातमी पसरवण्यात आली. विशेष म्हणजे आमच्यात अशी कोणतीच चर्चा झाली नव्हती. पण चुकीची बातमी पसरवून वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, याप्रकरणात तर स्वत: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज त्यांनी यावरून घुमजावदेखील केला. त्यामुळे जे बावनकुळेंच्या पोटात आहे, तेच त्यांच्या ओठावर आलं आहे, हे एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यावं, त्यांनी आता सर्तक राहायला हवं”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Ramdas Athawale | भाजप-शिवसेना जागावाटपाच्या वादावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
- Sanjay Gaikwad | “पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी, आम्ही कमीत कमी…”; संजय गायकवाडांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल
- Bacchu Kadu | जागावाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं उत्तर, म्हणाले…
- Sanjay Shirsat | 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?; संजय शिरसाटांचा पलटवार
- Ramdas Kadam | “भास्कर जाधव बांडगूळ, त्याची लायकी नाही तो नाच्या आहे, राजकारणातून..”; रामदास कदम आक्रमक
Comments are closed.