Nana Patole | “उधारीचा शेंदूर हे सरकार एकमेकांना…”; नाना पटोले यांचा राज्य सरकारवर घणाघात

Nana Patole | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरु झाल आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून तीव्र आंदोलन केलं. त्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नेहमी म्हणतात की आमच्याकडे बहुमत आहे. मात्र, त्यांच्याकडे बहुमत नसून सगळा उधारीचा गोळा केलेला शेंदूर आहे. उधारीचा शेंदूर घेऊन हे सरकार एकमेकांना फसवत आहे.

त्यामुळे या सरकारला शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बसण्याचा काही अधिकार नाही. भारतीय जनता पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे येणार आहे. कारण आम्हाला जनतेच्या प्रश्नांची घेणं-देणं आहे.”

As the opposition party, Congress will play its role properly – Nana Patole

पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट केलं आहे की आम्हीच विरोधात बसावं. त्यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पडेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही.”

“विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला काम करावं लागणार आहे. त्यामुळे आता आमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेला लुटायचं काम करत आहे”, असही ते (Nana Patole) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Di9QX8