Nana Patole | “काही हौश्या-नवश्या लोकांनी…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Nana Patole | मुंबई :  शिंदे-भाजप सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरुन शिंदे गट आणि भाजप नेते त्यांना प्रत्युत्तर देत असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘राज्यातील शिंदे गट-भाजपचे सरकार कधीही कोसळू शकते’, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. त्यावर ‘आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल’ असा विश्वास शिंदे गट आणि भाजपकडून व्यक्त केला जातो. त्यातच प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“20-25 आमदार शिंदे गटात आणि भाजपमध्ये जाणार”

“येत्या 15 दिवसांत इतर पक्षांतील 20 ते 25 आमदारांचा शिंदे गट-भाजपत प्रवेश होऊ शकतो, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे”, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत. बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“हौश्या-नवश्यांकडून पदयात्रा खराब करण्याचा प्रयत्न”

“मी कुणाच्याही वक्तव्यावर काहीही चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. राहुल गांधींची पदयात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली होती, तेव्हाही काही हौशे-नवशे लोकांनी ही पदयात्रा खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अशा वक्तव्यावर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर नाना पटोलेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“शिंदे-फडणवीस सरकार पडण्याचं काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अती बहुमतात आहे. त्यामुळे 20 ते 25 आमदार इकडे-तिकडे झाले, तरीही विद्यमान सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडून दिली जाणारी तारीख आणि आमदारांचा पक्षप्रवेश यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे. 10 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. त्यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येतील,” असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.