Nana Patole | “देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था म्हणजे भाजप, त्यांना सत्तेबाहेर करणं महत्वाचं”-नाना पटोले

Nana Patole | मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडली आणि सत्ताबदल झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आता महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही नेते शिंदे गटात, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वक्तव्य केलं आहे.

“सत्तेत अशी व्यवस्था असू नये जी देश उद्ध्वस्त करणारी ठरेल. त्यामुळे भाजपच्या विरोधात सगळ्या विरोधाकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Nana Patole Criticize BJP 

“भाजपच्या विरोधात जे आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊ. आमची ही भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आज देशात हाहाकार माजला आहे. कुणीही खुश नाही. मी महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने भूमिका मांडतो आहे. देशातलं अराजक थांबवायचं असेल तर भाजपच्या विरोधात मोठी आघाडी होणं आवश्यक आहे”, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

“देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था आहे ती व्यवस्था सर्वात आधी दूर करणं म्हणजेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं मुख्य लक्ष्य आहे. 2 एप्रिलला पहिली सभा संभाजीनगरमध्ये आहे. भाजपचं महाराष्ट्रातून उच्चाटन कसं होईल ते लक्ष्य ठेवून आम्ही प्रचाराला लागतो आहोत”, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

“भाजपला वाटतंय आम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोय”

“कसब्यात भाजपची काय अवस्था ते आपण पाहिलं. अमरावतीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला.भाजपला वाटतं आहे आम्ही सत्तेचा अमर पट्टा बांधून आलो आहोत तो पट्टा उतरवण्याची सुरूवात जनतेने केली आहे” असंही नाना पटोलेनी स्पष्ट केलं.

“तुम्ही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करा मात्र..”

“प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलणार नाही. त्यांची चर्चा उद्धव ठाकरेंसोबत सुरू आहे. मागच्या वेळचा अनुभव घेता आम्ही त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय सुरूवातीपासूनच आम्ही काही भूमिका घेणार नाही. उद्धव ठाकरेंनाही आम्ही हेच सांगितलं आहे की तुम्ही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करा मात्र तुम्ही त्यांच्याकडून प्रस्ताव मागवा” असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

“भाजपने अरबपती लोकांची कर्जं माफ केली आहेत. मात्र कर्मचारी, शेतकरी यांच्याबाबत सरकार काहीही विचार करत नाही असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. मूठभर लोकांचं कर्ज भाजपाने माफ केली आहेत मात्र शेतकऱ्यांचा विचार त्यांनी केलेला नाही”, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-