Nana Patole | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाणीव नाही”; नाना पटोलेंची परखड टीका 

Nana Patole | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या ज्वलंत प्रश्नांवर गप्पच बसले असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या महिन्याभरातल्या दुसऱ्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही. निवडणूक आल्यानंतर मोदींना मुंबईची आठवण येते असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यावर शाब्दिक हल्लाबोल केलाय.

दरम्यान, राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदी लोकसभेत देऊ शकलेले नाहीत. मग त्यांनी याच प्रश्नांची उत्तरं मुंबईततरी द्यावीत, असं नाना पटोले यांनी म्हंटल होतं. यावरून देखील त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका (Nana Patole Criticized Narendra Modi)

“मुंबईच्या भाषणात तरी ते त्यावर काही बोलतील असे वाटले होते पण अदानीवरही ते बोलले नाही. मोदी म्हणतात त्यांच्यासोबत देशातील १४० कोटी लोक आहेत मग एलआयसी व एसबीआयमध्ये या १४० कोटी जनतेमधीलच लोकांचे पैसे आहेत, तो पैसा सुरक्षित आहे का यावर त्यांनी बोलायला पाहिजे होते पण मोदींनी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही यातून ते अदानीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झाले”, असं नाना पटोले म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.