Nana Patole | “पत्रकारावर गुन्हे दाखल केले मग चंद्रकांत पाटील यांच्यावर का नाही?”; नाना पटोलेंचा खोचक सवाल

Nana Patole | नागपूर : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. तरीही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला. शाई फेकल्या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

“भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्र्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर का दाखल केला नाही?”, असा खोचक सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय.

“उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापुरुषांनी भीक मागितली, अशी भाषा वापरून त्यांची बदनामी केली, अपमान केला. सातत्याने महापुरुषांचा अपमान करूनही भारतीय जनता पक्षाने या वाचाळविरांवर कारवाई केली नाही, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरुच राहील,” असंही नाना पटोले म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.