Nana Patole | “पैसे वाटतानाचे पुरावे माझ्याकडे”; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

Nana Patole | मुंबई : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ‘भाजपने कसब्यात पैशांचा पाऊस पाडलाय. भाजपकडून लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली’, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा आरोप फेटाळून लावत ‘पैसे वाटून मतं मागायची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संस्कृती आहे’, असं म्हणत फडणवीसांनी ताशेरे ओढले. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी (Demand action from Election Commission)

‘कसबा पेठेत निवडणुकीच्या दरम्यान जो प्रकार घडला आहे त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे, निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत कोणाला फटका बसला पाहिलं आहे. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे’, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

“लोकांना विकत घेऊन निवडणुका जिंकायची भाजपची संस्कृती”- Nana Patole 

“कसब्यातील पैसे वाटप संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. मंत्री पोलीस संरक्षणात पैसे वाटप करीत आहेत. रवींद्र धंगेकर यांनाच मी उपोषण मागे घ्यायला लावले आहे. रवींद्र धंगेकरांना मी सांगितले आंदोलन मागे घ्या लोकांमध्ये जा, असं सांगितलं आहे. शेवटी लोकांना विकत घेऊन निवडणुका जिंकायच्या अशी भाजप संस्कृती आहे”, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.