Nana Patole | “भाजपमध्ये काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”; नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Nana Patole | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement of Directorate) जानेवारी महिन्यात छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मुश्रीफांच्या घरांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. ईडीच्या या कारवाईनंतर महाविकास आगाडीकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तेची इडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांची देखील ‘ईडी’च्या पथकाकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. मुश्रीफ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष मुश्रीफांच्या सोबत उभे आहेत. या कारवाईवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपवर टीका करताना पहायला मिळत आहेत.

Nana Patole Reaction on ED action against Hasan Mushrif

“भाजप हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे. त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण अनिल देशमुखांचं प्रकरण नुकतंच पाहिलं आहे. परमवीर सिंहांनी जे काही आरोप केले त्याची काही चौकशी झाली नाही”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

“भाजपत काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”

“अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप केला होता. परंतु त्यांना या प्रकरणात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एका निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात राहावं लागलं. त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्यापैकी एकाही प्रकरणात ईडी किंवा सीबीआयकडून कारवाई झालेली नाही. परंतु अशा कारवाईनंतर जे लोक भाजपमध्ये गेले ते स्वच्छ झाले. भाजपकडे  गेलेल्या लोकांची चौकशी का झाली नाही? भाजपत काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-