Nana Patole | “भाजप यात्रा स्पेशालिस्ट, त्यांनी पंचामृतात विष कालवलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole | मुंबई : भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी लोकांसाठी काशी-सारनाथ यात्रेचे आयोजन केले आहे. राम कदम यांना आयोजित केलेल्या या यात्रेबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

“भाजप हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट” (Nana Patole Criticize BJP)

“भाजप हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट आहे. पण आता कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. लोक भाजपसोबत जाणार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीद्वारे लोकांचा कल समजला आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“भाजपने पंचामृतात विष कालवलं”

“आपण नुकतंच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पाहीलं की, महविकास आघाडीची पंचसूत्री होती. त्याचं त्यांनी पंचामृत केलं. अमृत देत असताना त्यात विष कालवून देण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्यामुळे आता त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी काही होणार नाही. त्याचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. येणाऱ्या काळात जनता भाजपला सत्तेच्या बाहेर काढेल”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

“नमस्ते ट्रम्प करत कोरोना आजार भारतात आणला”

“सगळे आजार हे विदेशातून आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने काही सल्ले दिले ते केंद्र सरकारने ऐकले नाहीत. त्यांनी सांगितलेले निर्बंध भारताने लावले नाहीत. देशाच्या सीमा सील करण्यास सांगितलं, ते केलं नाही. उलट नमस्ते ट्रम्प करत देशात कोरोनासारखा आजार आणला. यामुळे देशाची मोठी हानी झाली. अशा प्रकारचे विदेशी आजार देशात पसरत असताना त्याला प्रतिबंध करण्याऐवजी केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत आहे. त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे”, असंही नाना पटोले H3N2 Influenza या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत बोलताना म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-