Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Nana Patole | मुंबई : काँग्रेसने (Congress) नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकत भाजपला ( BJP) कर्नाटकमधून हद्दपार केलं आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलं असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडीना वेग आला आहे. महाराष्ट्रात सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्याच्या बॅनरची चर्चा सध्या सुरू असून यामध्ये अजित पवार ( Ajit Pawar), आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांचे बॅनर पाहायला मिळाले. त्यावरून राजकीय वर्तुळात टीका- टिप्पणी देखील झाली. तर कल्याणमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे ( Nana Patole) भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आला आहे. त्यावरच नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी कार्यकर्त्यांनी केलेल्या बॅनरबाजीचं समर्थन करत नाही- 

माध्यमांशी बोलताना नाना पटोले ( Nana Patole) म्हणाले की, सध्या राज्यात वेगळं वातावरण तयार झालं आहे. एकाच पक्षात तीन- तीन बॅनर लागतात. तर काहीजण म्हणतात की, मी पुन्हा येईल. यामुळे आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे की आपल्या पक्षातील मुख्यमंत्री असावा यामुळे ही स्वाभाविक गोष्टी आहे. परंतु, मी कार्यकर्तच्या या गोष्टीच समर्थन करत नाही त्यांनी पुन्हा अस करु नये हे मी त्यांना सांगितलेलं आहे. तसचं गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची ही प्रथा-परंपरा नाही. कोणतीही निवडणुका झाली, मतदान झालं आणि निकाल हाती आल्यानंतर आमचे हायकमांड मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतात त्याचं आम्ही सर्वजण पालन करतो असं नाना पटोले ( Nana Patole) म्हणाले.

Nana Patole Targeted On Narendra Modi

दरम्यान, नाना पटोले ( Nana Patole) यांनी संसद भवनाच्या उद्घाटनावर देखील भाष्य केलं. पटोले म्हणाले की, जे काही सध्या संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाबाबत चालू आहे ते संवैधानिक मुल्ये जपली नाही. संसदेची ही फक्त इमारत नसून लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर असते. यामुळे संविधानाची जोपासणा केली पाहिजे. यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते याच उदघाटन झालं पाहिजे. असं नाना पटोले (Nana patole) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MzelRo