Nana Patole | भास्कर जाधव यांच्या आरोपावर नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट सातत्याने यावर भाष्य करत असतात. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माध्यमांना दिलेली मुलाखत मी वाचली. त्याचबरोबर मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील मुलाखत पाहिली. महाविकास आघाडी एकत्र मिळून धोरण सांगत असतात, असं मविआ म्हणते. मात्र, स्वतंत्र मुलाखती वेगळेच काही दर्शवत आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, “आम्हाला आमची भूमिका स्पष्टपणे माहित आहे. मात्र, कुणी त्याचा चुकीचा अर्थ लावत असेल तर त्यावर आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही आतापर्यंत काहीच बोललो नाही. बातम्यांचा चुकीचा अर्थ लावून गैरसमज निर्माण केला जात आहे आणि ते फार चुकीचं आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “जागा वाटपाचा निर्णय अजून झाला नाही. तो निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आमची भूमिका आधीपासून अशीच आहे. त्यामुळे गैरसमज करून घेण्यात काही अर्थ नाही. महाविकास आघाडीत चालणार आहे आणि पुढेही आम्ही मिळून काम करू.”

महत्वाच्या बातम्या