Nana Patole | “महाराष्ट्राला लागलेला कलंक उद्याच्या निकालामुळे पुसला जाईल” : नाना पटोले

Supreme Court Result | मुंबई : उद्याच्या (11 मे) सत्तासंघर्षाच्या निकालावरून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा निकाल 16 आमदारचं भवितव्य तसचं महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे यावर अवलंबून असणार आहेत. तर आता या प्रकरणावर काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले (What did Nana Patole say)

नाना पटोले म्हणाले की, आमचा पूर्ण लोकशाहीवर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. तसचं हे 16 आमदार अपात्र ठरवणार असून विजय हा महाविकास आघाडीचा होणार आहे. त्यावेळी देखील नरहरी झिरवळ यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे की, तुम्हीच निर्णय घ्यावा. त्यामुळे कोर्टातच निकाल लागेल आणि न्यायदेवता न्यायानुसार निर्णय देईल. याचप्रमाणे आतापर्यंत जी काही महाराष्ट्राची बदनामी झाली आहे ती बदनामी नंतर होणार नाही. उद्याच्या या निकालामुळे महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसला जाईल असा आम्हाला विश्वास आहे असं देखील नाना पटोले म्हणाले.

दरम्यान ,पटोले यांना उद्धव ठाकरेबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं हा वेगळा विषय आहे. तर शेड्युल 10 चा विषय वेगळा आहे. राजीनामा देण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्याला कोणतंही बंधन नाही. शेड्युल 10 मध्ये अपात्रतेची व्याख्या अतिशय स्पष्ट आहे. यामुळे आम्हाला न्याय नक्की मिळणार आहे. असं पटोले म्हणाले. तसचं नाना पटोले यांनी आज ( 10 मे) पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीबद्दल देखील बोलताना म्हटलं की, आम्हाला खात्री आहे की कर्नाटकमधून देखील भाजप हद्दपार होणार आहे. कारण एक्झिट पोल मध्ये 50 ते 60 टक्के मतदारांची पसंती काँग्रेसला आहे. अशा विषयावर नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेदरम्यान भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-