Nana Patole | “महाविकास आघाडीत मतभेद? तर आमचा प्लॅन-बी तयार आहे ” नाना पाटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ
Nana Patole | मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) मोठं वक्तव्य केलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. राज्यात मोठ्या घडामोडी सुरू असताना 2024 मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आत्ताच कसं सांगणार? असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole ) महाविकास आघाडीबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणला वळण मिळण्याची शक्यता आहे.
आमचा बी-प्लॅन तयार : नाना पटोले (Our B-Plan ready : Nana Patole)
नाना पटोले म्हणाले की, “महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची तयारी आहे. पण जर आघाडी झाली नाही तर आमचे पुढचे प्लॅन तयार आहेत.” नाना पटोलेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकप्रकारे काँग्रेसचा आणखी एक डाव तयार असल्याचं सांगत नाना पटोले यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. पटोले यांच्या या वक्तव्यावरून आता वेगळा राजकीय अर्थ काढला जात आहे.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेले दिसत आहेत. यावरूनही देखील पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जनता ठरवेल. त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. सध्या जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तसंच आज निवडणुका नाहीत त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल”, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. तसचं भाजपला महाराष्ट्रात लोकांनी निवडून दिलं आहे परंतु जास्त काळ भाजप महाराष्ट्रात टिकणार नाही असं देखील पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- Barsu Refinery Project | रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत अन् शरद पवार यांच्या भेटीमध्ये काय ठरलं ? ; वाचा सविस्तर
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Arvind Kejriwal | भाजपचा अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप ; तर केजरीवालांनी बंगल्याच्या नूतनीकरणावर केले इतके कोटी रुपये खर्च!
- Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या ‘त्या’ पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव
- Amit Shah | …म्हणून एकनाथ शिंदे घेणार अमित शहांची भेट!
Comments are closed.