Nana Patole | महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले…

Nana Patole | मुंबई : राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण खूपच खराब होत चाललं आहे. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हा महाविकासर आघाडी सरकार पूर्णपणे ढासळलं. तरीही काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) पक्ष अजूनही एकत्र असल्याचं दिसून येतं आहे. परंतू आगमी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यासंदर्भात एक मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले (Nana Patole)

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. ज्यांना आमचा विचार मान्य आहे, ते आमचे मित्र आहेत. शिवसेना आणि भाजप मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत एकत्र होते. याच कारणामुळे आम्हाला शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे, असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

भाजप आणि शिवसेनेचे झालेले भांडण आणि पहाटे स्थापन झालेलं सरकार या सर्व घटनाक्रमाची आपल्याला कल्पना आहे. म्हणूनच शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. ते आमच्या विचारासोबत असतील तर ते आमचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी सगळे सोबत होते. त्यामुळे अजूनही आम्हाला संभ्रम असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली होती. मात्र नाना पटोले यांनी महाविकास आघाडीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाविकासर आघाडी आगमी निवडणुकांमध्ये एकत्र दिसणार की नाही?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.