Nana patole | …म्हणून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट
Nana patole | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चना उधाण आलं आहे. याबाबत मविआच्या नेत्यांनी देखील दावा केला आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं . त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चानी जोर धरला आहे. याचप्रमाणे जर सत्तांतर झालं तर महाविकास आघाडीमध्ये जागावाटप कसं होणार? कोणाचा मुख्यमंत्री असणार याबाबत माध्यमांकडून देखील सतत प्रश्न उपस्थित केले जातात. यामुळे या प्रश्नाला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले नाना पटोले (What did Nana Patole say)
नुकत्याच एका मुलाखती दरम्यान नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत भाष्य करत भूमिका मांडली आहे. पटोले म्हणाले की, “आतापर्यंतची जी लोकशाहीची परंपरा आहे ती म्हणजे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो” तशीच भूमिका घेतली जाईल. परंतु जर कोणत्याही कारणामुळे आमच्यात आघाडी झाली नाही तर काँग्रेसचा प्लॅन बी तयार आहे. कारण, 2014 मध्ये काँग्रेसला धोका मिळाला आहे यामुळे यावेळी मुख्यमंत्री आणि जागावटपाबाबत काँग्रेस सतर्क असणार आहे. त्या- त्या वेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पटोले पुढे बोलताना म्हणाले की, मी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आगामी काळात काँग्रेस पक्ष सतर्कता बाळगून निर्णय घेईल. तर गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी देखील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं म्हटलं होतं. त्यावरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक टीका – टिप्पणी करत असल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या –
- Raj Thackeray – राज ठाकरेंनी सांगितले शरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे खरं कारण
- Uddhav Thackeray | महाडमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर सडकून टीका !
- Raj Thackeray | रत्नागिरीमधील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ; म्हणाले …
- Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे – आदित्य ठाकरे
- Sanajy Raut | “मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हरवले आहेत” : संजय राऊत
Comments are closed.