Nana Patole | राज्य सरकार सध्या हवेत असून खाली यायला तयार नाही – नाना पटोले
Nana Patole | मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. याआधी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत होते.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकारच्या सध्या फक्त दिल्ली वाऱ्या सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
This government has nothing to do with the people – Nana Patole
प्रसार माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “राज्य सरकार सध्या खूप हवेत आहे. सरकार सध्या जमिनीवर यायला तयार नाही. कुणाचे आमदार जास्त आहे?
कुणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे? आणि दिल्लीच्या वाऱ्या किती करायच्या? यामध्येच या सरकारचा वेळ चालला आहे. या सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही.”
नाना पटोले (Nana Patole) यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नाना पटोले यांना उत्तर देत संजय शिरसाट म्हणाले, “नाना पटोले दिल्लीमध्ये का गेले होते?
ज्यांना विरोधी पक्षनेता ठरवता येत नाही, ते सध्या आम्हाला अक्कल शिकवत आहे. सरकार चालवणं म्हणजे काही खाऊ नाही. आम्ही ज्या पद्धतीनं मजबुतीनं काम करत आहोत ते बघून यांची पोटदुखी वाढली आहे.”
पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “आज आमचे मुख्यमंत्री कुठपर्यंत पोहोचले आहे, हे अख्ख्या महाराष्ट्रानचं नाही तर संपूर्ण देशानं पाहिलं आहे. हे सरकार जनतेशी किती जुळवून घेत आहे हे सर्वांनी पाहिलं आहे.
त्यामुळेच ही लोक अशी वक्तव्य करत आहे.” पूर्ण अधिवेशन काळापर्यंत नाना पटोले यांनी विधानसभेचा विरोधी पक्ष नेता ठरवून दाखवावा, असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून शिंदे गटाचा मस्त कार्यक्रम…”; संजय राऊतांचं मोठं विधान
- Ajit Pawar | ही दोस्ती तुटायची नाय; उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये झळकले बॅनर्स
- Ajit Pawar | “2024 मध्ये अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत…”; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महत्वाची भविष्यवाणी
- Chhagan Bhujbal | “आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले…”; छगन भुजबाळांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
- Sanjay Raut | “… म्हणून केंद्र सरकार मणिपूरकडे लक्ष देत नाही”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43DD3Xl
Comments are closed.