Nana Patole | “राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान…’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Nana Patole | सोलापूर: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात नाना पटोले यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) भाष्य केलं आहे. पटोले यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान करणं हे माझे लक्ष आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या दृष्टीने तयारीला लागा, असं नाना पटोले सोलापुरात म्हणाले आहे.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “राहुल गांधी यांना देशाचं पंतप्रधान करणं हे माझे लक्ष आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या दृष्टीने कामाला लागा. खासदार निवडून देण्याची हमी मला तुमच्याकडून हवी आहे. कुणी काहीही बोलू द्या त्याने काही फरक पडत नाही. ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या काँग्रेसची ही लढाई आहे. आपण काय करू शकतो, हे आपण सर्वांना दाखवून देऊ.”

पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “जनतेच्या पैशातून जनतेसाठी काँग्रेसने अनेक उपक्रम राबवले आहेत. हे उपक्रम सरकार रोज विकून खात आहे. आपण सर्व काँग्रेस पक्षाचे शिपाई आहोत. काँग्रेस पक्षाला जिंकवणे ही आपली जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसचा शिपाई लढला, त्याच पद्धतीने आपल्याला या निवडणुका लढायच्या आहे.

“आज देशाची काय स्थिती झाली आहे? देशाच्या जनतेला लुटणं त्यांना गरीब करणं आणि पुन्हा एकदा गुलामी करायला लावणं अशी मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. त्याचबरोबर भाजप लोकशाही मान्य करत नाही. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर एका काळ्या टोपीवाल्याला बसवलं होतं. त्या काळ्या टोपीवाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. यातून कळतं की भाजपची मानसिकता काय आहे”, असही ते (Nana Patole) बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Mu4wEa