Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना सुनावलं होतं.
तर दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले होते. अशात सभागृहात आज नाना पटोले यांनी छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
The government has not yet provided financial assistance to the onion farmers – Nana Patole
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “सत्तेत सामील होण्यापूर्वी छगन भुजबळ आधी विरोधकांच्या बाकावर बसत होते. आता ते सत्ताधाऱ्यांसोबत बसतात.
विरोधामध्ये असताना छगन भुजबळ यांचा घसा बोलताना कोरडा झाला होता. मात्र, आता छगन भुजबळांची भाषा बदलली आहे. सरकारनं अद्याप कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत केलेली नाही.”
दरम्यान, भाईंदरमध्ये एक इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये ढिगार्याखाली अनेक नागरिक अडकले आहेत. याबाबतची वस्तुस्थिती सभागृहनं आणि सांगावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमात झालेल्या नागरिकांच्या मृत्यूवरून विरोधकांनी गोंधळ केला असून विरोधकांनी सभात्याग (Nana Patole) केला आहे.
काल रात्री रायगडमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेवरून देखील सभागृहात गदारोळ झाल्याचं (Nana Patole) दिसून आलं आहे. आजच्या युगात टेक्नॉलॉजी फास्ट झाली आहे. त्यामुळे भूगर्भात नेमकं काय सुरू आहे याचा शोध घ्यावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी सभागृहात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | माणुसकी शिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे; मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात
- Jitendra Awhad | मी घरं बांधून दिली तशी तुम्ही देणार का? इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज्य शासनाला खडा सवाल
- Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
- Amit Shah | इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अमित शाहांचं ट्विट, म्हणाले…
- Eknath Shinde | रायगडच्या इर्शाळवाडीत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3ryjqm6