Nana Patole | “सगळा मसाला आमच्याकडे आहे, वेळ आल्यावर…”; सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर नाना पटोले आक्रमक
Nana Patole | पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचा एबी फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय.
“भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जो संदेश आम्हाला द्यायचा आहे, आम्हाला सर्वांना जोडून घ्यायचं आहे. पण जे कुणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात त्या लोकांचा आमच्याकडे सगळा मसाला आहे. मला आज त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना सुनावलं.
“माझ्याकडे खूप मसाला वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार. हा परिवारातला वाद आहे. हा जास्त अंगावर आणला तर माझ्याकडे खूप मसाला आहे. मला त्या लेव्हला जाऊ देऊ नका”, असा इशारा पटोलेंनी दिला.
Satyajeet Tambe allegations on Nana Patole
“नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांब यांनी केला आहे. “माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही” असा सवाल सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याने आदित्य ठाकरेंची काढली उंची, वय आणि पात्रता
- Satyjeet Tambe | “त्यांच्या सल्ल्याला माझा पुर्णपणे विरोध होता”; सत्यजीत तांबेंनी सांगितलं बंडखोरीचं कारण
- Satyajeet Tambe | “देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य
- Satyjeet Tambe | “थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव प्रदेश कार्यालयाचा”; सत्यजीत तांबेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
- Naresh Mhaske | “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झालीय”
Comments are closed.