Nana Patole | सभा उधळून लावण्याच्या इशाऱ्यावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “मनसेच्या काळ्या झेंड्यांना…”

Nana Patole | मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज शेगाव येथे जाणार असून ते तिथे सभा देखील घेणार आहेत. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मनसे (MNS) पक्षाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शेगाव (Shegaon) येथील सभा उधळण्याचा इशारा संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“मनसेच्या या काळ्या झेंड्यांना आम्ही गुलाबाच्या फुलानं उत्तर देऊ”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, “राहुल गांधींनी सावरकरांविषयी मांडलेल्या भूमिकेव्यतिरिक्त काही वेगळी माहिती मनसेकडे असल्यास त्यांनी ती मांडावी.”

पुढे ते म्हणत, “हा वैचारिक महाराष्ट्र आहे. काँग्रेसची ही विचारांची यात्रा आहे. ही यात्रा आता जनतेची झाली असून या यात्रेला विरोध करायचा असल्यास मनसेनं तो करावा.” दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना पत्रकाराने मनसेच्या इशाऱ्याबाबत प्रश्न विचारताच कोण मनसे?, असा सवाल करत नाना पटोलेंनी मनसेची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणालेत संदीप देशपांडे?

मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बईहून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ठाणे, भिवंडी, नाशिक असा प्रवास करत ते शेगावला पोहोचणार आहेत. तसेच काँग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी दिलाय. काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आमच्या अविनाश यांनी अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत, असं देशपांडे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.