Nana Patole | “सरकारने योग्य वेळी दखल घेतली नाही म्हणून…”; इर्शाळवाडी घटनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल
Nana Patole | रायगड: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेनंतर रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
काल (20 जुलै) घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील दाखल झाले आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
The government has not taken notice at the right time – Nana Patole
माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “इर्शाळवाडी येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असतं तर नाहक बळी गेलेच नसते. सरकारनं योग्य वेळी दखल घेतलेली नाही.
त्यामुळे या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. आता तरी सरकारनं जलद गतीनं हालचाली सुरू करायला हव्या. लोकांना सरकारनं आवश्यक ती मदत वेळेत करायला हवी.”
दरम्यान, इर्शाळवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळं या ठिकाणी बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे. म्हणूनच बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा आज सकाळी 6.30 वाजल्यापासून बचावकार्य (Nana Patole) सुरू झालं आहे.
या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली (Nana Patole) आहे. तर 103 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. त्याचबरोबर 100 पेक्षा अधिक लोक ढिगार्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर इर्शाळवाडीतील 48 घरांपैकी 17 घरं या घटनेत गाडली गेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा धक्का! नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांना दर्शवला पाठिंबा
- Eknath Shinde | “इर्शाळवाडी दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू तर…”; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
- Raj Thackeray | कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? – राज ठाकरे
- Ajit Pawar | माझा वाढदिवस साजरा करू नका; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
- Nana Patole | “विरोधात असताना छगन भुजबळांचा घसा कोरडा व्हायचा आणि आज…”; नाना पटोलेंचा छगन भुजबळांवर घातक वार
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pWM93E
Comments are closed.