Nana Patole | “माझं नाव नाना आहे दादा नाही”; नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण

Nana Patole | मुंबई : राज्यात  सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहे. ठाकरे गटाला गळती लागली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही नेते शिंदे गटात, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वक्तव्य केलं आहे.

“सत्तेत अशी व्यवस्था असू नये जी देश उद्ध्वस्त करणारी ठरेल. त्यामुळे भाजपच्या विरोधात सगळ्या विरोधाकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Nana Patole big statement about BJP

“भाजपच्या विरोधात जे आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊ. आमची ही भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. आज देशात हाहाकार माजला आहे. कुणीही खुश नाही. मी महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने भूमिका मांडतो आहे. देशातलं अराजक थांबवायचं असेल तर भाजपच्या विरोधात मोठी आघाडी होणं आवश्यक आहे”, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

Nana Patole says ‘my name is nana Not dada’

“माझं नाव नाना आहे दादा नाही. नाना म्हणजे कुटुंब प्रमुखाला आपल्याकडे म्हटलं जातं. मी त्याच भूमिकेत आहे, पक्ष पुढे घेऊन जातो आहे. मात्र काहीजण माझ्यावर आरोप करतात की मी दादागिरी करतो. पण मी दादा नाही तर नाना आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे, राजकारणात आम्ही विजयाची घोडदौड कायम ठेवू आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ”, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी हा टोला अजित पवार यांना लगावल्याची चर्चा आता सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-