InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली’; नाना पटोलेंचा आरोप

- Advertisement -

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी फक्त काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली आहेत असा आरोप काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.  तसेच राज्यपालांची भूमिका संशयास्पद असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तेचा तिढा आज देखील कायम राहणार असल्याचंच चित्र सध्या दिसतं आहे. कारण शिवसेना अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याविषयी आज शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अतिशय आक्रमकपणे शिवसेनेची भूमिका मांडली. यावेळी संजय राऊतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, ‘कुणीही तिसऱ्या मध्ये पडून मध्यस्थी करण्याची गरज नाही. कारण उद्धव ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.’ असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यातच भाजपच्या एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की जर शिवसेनेचे सहकार्य केले नाही आणि गरज पडलीच तर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशीही संपर्क करु, अशा आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.