नारायण राणेंच्या भविष्यवाणीची नाना पटोलेंकडून खिल्ली, म्हणाले…

नागपुर : २०१९ ला शिवसेनेने २५ वर्षे सुरु असलेली भाजपासोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारसरणीवर या सरकारवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भिन्न विचारसरणीचे हे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

यानंतर हे सरकार पडणार असं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आता याबाबत वक्तव्य केल आहे. मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार अशी नवी राजकीय भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे. राणेंच्या या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे.

नाना पटोले नागपुरमध्ये बोलत असताना त्यांनी भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे, असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. तसेच आता भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असंही ते म्हणाले आहेत. भाजपवाले भविष्यवाणी करणारे आहेत, त्यांची भविष्यवाणी कधीही खरी ठरत नाही आणि त्यांच्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पुर्ण केली आहेत. त्यात ते गेल्या दोन वर्षांपासून भविष्यवाणी करत आहेत पण त्या भविष्यवाणीला काहीही अर्थ नाही, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला उद्देशुन लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा