नाना पटोलेंचा शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा

मुंबई : सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं या मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्या. त्यानंतर ममता बॅनर्जीं आणि शरद पवार यांची हि भेट देशात चर्चेचा विषय बनलीय. या भेटीनंतर देशात अनेक चर्चांना सुरुवात झालीय. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय.

आज देशातील परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जे कोणी समजतात ते या पद्धतीच्या भूमिका मांडणारच आहेत. आम्ही स्पष्ट सांगितलेले आहे. देश विकणाऱ्या बरोबर राहायचे आहे की देश वाचवणाऱ्यां बरोबर राहायचे. हे प्रत्येक राजकीय पक्षाने ठरवावे. सामनातून आज मांडलेली भूमिका ही पक्ष सत्ता वाचवण्यासाठी नसून देशाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. कारण ममता बॅनर्जी ने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं ते देश विकणाऱ्याची साथ देण्याचा संकल्प मांडलेला होता, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे.

तसेच देशात यूपीए अस्तित्वात आहे का ? असा सवाल विचारणाऱ्या ममता बॅनर्जींना कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी लक्ष्य केले होते. आजच्या सामनाच्या अग्रलेखाच्या निमित्तानेही नाना पटोलेंही प्रतिक्रिया मांडली आहे. देशाला भाजपविरोधात मजबूत पर्याय द्यायचा असेल तर तो कॉंग्रेसला वगळून चालणार नाही. देश विकणाऱ्यांसोबत आज कोणीही उभे राहणार नाही, देशाला फक्त कॉंग्रेसशिवाय वाचवू शकते, म्हणून शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेला दूजोरा दिला आहे.

तसेच, भाजप सरकार देशात आल्यानंतर ज्या पद्धतीचं तबाही सुरू केली आहे, चीन अरुणाचल भगत मध्ये अतिक्रमण करून बसलेले आहे, दुसरीकडे देशाची प्रॉपर्टी विकायला सुरुवात केली आहे. संविधानिक व्यवस्था तुडवण्याचे काम काम करत असेल तर अशा वेळेस ममता बॅनर्जींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून एक प्रकारे देश विकणाऱ्याची साथ देणाऱ्याची भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे सामन्यांमधून भूमिका मांडली आहे ते देश हिताची भूमिका आहे ते सरकार वाचवण्यासाठी नाही. अंतर्गत फेरबदल हायकामण्डचा विषय आहे, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा