“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…”

मुंबई : काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणुक लढवणार असल्याचं म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.

“नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं… जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे,” असं अतुल भातखळकर यांनी ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नाना पटोलेंना टॅग केलं आहे.

आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना देखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा, असं नाना पटोलेंनी म्हणाले होते.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा