नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला मोठा दणका, आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे आदेश

मुंबई : २०१९ ला शिवसेनेने २५ वर्षे सुरु असलेली भाजपासोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारसरणीवर या सरकारवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भिन्न विचारसरणीचे हे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

तसेच या सरकारमध्ये आपापसात मतभेत असल्याच्या बातम्या वारंवार माध्यमातून येत आहेत. सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंहि चर्चा सुरु असतात. यानंतर आता काँग्रेसने अखेर महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाना पटोले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत जिल्हाध्यक्षांना आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचं देखील देखील प्रदेश काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र यानंतर आता काँग्रेसच्या या निर्णयावर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा