InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रद्द झालेला ‘नाणार’ प्रकल्प आता रोह्यात

शिवसेनेबरोबरच्या युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा संपूर्ण प्रकल्प रोहा परिसरात हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच यासाठी 50 हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आलेली आहे.

सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा तेलशुद्धीकरण प्रकल्प सुमारे तीन लाख कोटींचा आहे. रोहा, अलिबाग आणि मुरूड तालुक्यांतील किनारपट्टीवर तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ही वसाहत सिडकोच्या माध्यमातून उभारली जाईल.

प्रकल्पासाठी राज्य सरकारने रोहा, अलिबाग आणि मुरुड तालुक्यांतील ४० गावांच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यासाठी सुमारे ५० हजार एकर जमिनीवर (१९१४६ हेक्टर्स) एकात्मिक औद्योगिक वसाहत उभारली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply