InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुरगाव नगराध्यक्षपदी नंदादीप राऊत यांची निवड

- Advertisement -

मुरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष – उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आज (दि.४) बोलवण्यात आलेल्या बैठकीत नगरसेवक नंदादीप राऊत यांची नगराध्यक्षपदी तर नगरसेविका रिमा सोनुर्लेकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. सदर निवडणूक मतदानाद्वारे घेण्यात आली असता नगरसेवक नंदादीप राऊत यांना नगराध्यक्ष पदासाठी १४ तर सैफुल्ला खान यांना ११ मते मिळाली असून उपनगराध्यक्ष पदासाठी रिमा सोनुर्लेकर यांना १४ व मुरारी बांदेकर यांना ११ मते मिळाली.

मुरगाव नगरपालिकेचा नवीन नगराध्यक्ष – उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आज सकाळी ११.३० वाजता पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली होती. ह्या बैठकीला पालिका संचालक डॉ. तारीक थोमस यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थिती लावली असून मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांचीही उपस्थिती होती. मुरगाव नगरपालिकेतील २५ सही नगरसेवक ह्या बैठकीत उपस्थित होते.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.