Nani 30 | ‘सीता रामम’नंतर ‘नानी 30’ मध्ये दिसणार मृणाल ठाकूर, पाहा फर्स्ट लूक

Nani 30 | टीम महाराष्ट्र देशा: अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेत आहे. कारण तिच्यासाठी 2022 हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. अशा परिस्थितीत मृणाल आणखी एका मोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ती ‘नानी 30’ (Nani 30) मध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

‘नानी 30’ तेलुगु चित्रपट दिग्दर्शक शौर्यव यांनी दिग्दर्शित केला आहे. मोहन चेरुकुरी (CVM), डॉ. विजेंदर रेड्डी तेगला आणि मूर्ति के.एस. यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला मल्याळम संगीतकार हे हेशम अब्दुल वहाब यांनी संगीतबद्ध केले आहे.

‘नानी 30’ चे फर्स्ट लूक पाहता असे लक्षात येत आहे की, हा एक इमोशनल फॅमिली ड्रामा असलेला चित्रपट आहे. नानीचे गेल्या वर्षी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये सुंदरनिकी आणि हिट: द सेकंड केस या चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांना चाहत्यांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. नानीच्या आगामी चित्रपटामध्ये ‘दसरा’ या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये नानीसोबत कीर्ती सुरेश देखील दिसणार आहे.

यावर्षी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती आदित्य रॉय कपूर सोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये मृणाल पोलिसाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामधील पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचे तिने सांगितले होते. मृणाल ठाकूरने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की,”यशस्वी होण्यासाठी आणि मोठी फिल्मस्टार होण्यासाठी तिने तब्बल आठ वर्षे वाट पाहिली आहे.” योग्य भूमिका आणि योग्य वेळेची वाट पाहिल्यामुळे तिला यशाची गुरुकिल्ली मिळाली आहे. असं देखील मृणाल या मुलाखतीमध्ये म्हणाली होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.