Narayan Rane। विनायक मेटेंच्या जाण्यानं मराठा समाजाचं नुकसान – नारायण राणे

Narayan Rane । मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे मराठा समाजावर शोककळा पसरली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. तसेच आता अनेक राजकीय नेते आपआपली प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

नारायण राणे म्हणाले कि, मराठा समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही आणि आक्रमक असे ते नेते होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विविध मार्ग अवलंबत, आंदोलने करत सतत पाठपुरावा केला, असे नारायण राणे म्हणाले. तर दुसरीकडे आता मेटेंच्या या अपघाताची आता चौकशी सुरु आहे.

दरम्यान, मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचीही चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी एकूण आठ पथकं तयार करण्यात आली आहे. फॉरेन्सिकची टीमही यामध्ये असणार आहे. पहाटे पाच वाजून ५ मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. यावेळी आपल्याला जवळपास एक तास मदत मिळाली नसल्याचा आरोप गाडीच्या चालकाने केला आहे. प्रथमदर्शनी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.