Narayan Rane | “आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांना…”, नारायण राणेंचा खोचक टोला

Narayan Rane | मुंबई : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सुरु आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे नेते देखील सहभागी होत आहेत. काही दिवसांपुर्वीच आदित्य ठाकरे देखील यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला शिवसेने कडून देखील नकार पाहिला मिळाला. यावरुन भाजप (BJP) नेते नाराण राणे (Narayan Rane) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे हे बालीश असून सावरकरांचा इतिहास त्यांना आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे याना माहिती नाही. त्यामुळे त्यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे गांभीर्य कळले नाही असा, टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. सावरकरांचे देशासाठी योगदान खूप मोठं असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते ते आदित्य ठाकरेंना माहिती नाही, असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, हे फक्त त्या यात्रेत फोटो काढण्यासाठी गेले त्यामुळेच त्यांना या वक्तव्याचे गांभीर्य नसल्याने त्यांना कोणतीही चीड आली नाही का, असा खोचक सवाल देखील नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सगळ्या पक्षाचे मिळून सध्या भारत जोडो सुरू असून या तीन पक्षाची मने जुळलेली नाहीत. सत्तेसाठी फक्त एकत्र येतात. यामध्ये त्यांना काही यश मिळणार नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. जे कार्य सध्या पंतप्रधान मोदी करत आहेत ते प्रशंसा करण्यासारखे आहे. यामुळे भारताची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. जगात असे कर्तृत्वान नेते म्हणून त्यांचा गौरव होतो यापेक्षा आणखी काय हवं असं कौतुक नारायण राणेंनी पंतप्रधानांचं केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.