Narayan Rane | “उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे”; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Narayan Rane | नाशिक : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोक्यांचे व्यवहार करतानाचे कॅसेट असल्याचं सांगितलं आहे.

“उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे”-Narayan Rane

“माझ्याकडे उद्धव ठाकरेंच्या संभाषणाच्या अनेक कॅसेट आल्या. पण मी त्यातील एकाचाही उपयोग नाही केला. ते शिंदे गटातील आमदारांना खोके-खोके म्हणतात. पण उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे आले आहेत. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ खोके जमवले की काही पवित्र कामही केलं, याचं आत्मपरीक्षण करावं. सगळ्या क्लिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. पण याचा योग्यवेळी वापर करेन”, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

“त्यांच्याकडे फक्त 15 आमदार आहेत”(Narayan Rane criticize Uddhav Thackeray)

‘शिवसेना सोडलेले सगळे नेते संपतील पण शिवसेना संपणार नाही’ या दाव्याबाबत विचारलं असता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. “उद्धव ठाकरे दावा करतात, पण त्यांच्याकडे आता काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यांच्याकडे 15 आमदार आहेत, पण ते आमदार आगामी निवडणुकीपर्यंत सोबत राहतील की नाही? हे माहीत नाही”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केली आहे.

“ठाकरेंना कुठलंही अस्तित्व राहिलं नाही”- Narayan Rane

“दावा सगळेच करत असतात. पण स्वत: दावा करून काहीही उपयोग नाही. राज्यातील जनतेनं दावा करायला हवा. उद्धव ठाकरेंना कुठलंही अस्तित्व राहिलं नाही. त्यांना सोडून गेलेली लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात? याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं”, असा खोचक सल्ला नारायण राणे दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.