Narayan Rane | “कुठं काय बोलावं हे त्यांना…”; ऋतुजा लटकेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंची टीका

Narayan Rane | मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे. यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवादसाधत प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी नोटाला मिळालेल्या मतांवर प्रतिक्रिया देताना भाजपाची मतं ही नोटाला गेली, असे म्हटले होते. यावर भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले,“आधी त्यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र हातात घ्यावं, मगच टीका करावी”. “कुठं काय बोलावं हे त्यांना अवगत नाही. भाजपाची मतं कोणाला पडली, यावर बोलायचं झाल्यास, आम्ही त्यांना यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. आम्ही लटकत नाही. आमचा निर्णय पक्का असतो”, असे प्रत्युत्तर नारायण राणे यांनी ऋतुजा लटके यांना दिले आहे.

ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना जवळपास 60 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलंय. पण जवळपास साडे 12 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाचं बटन दाबत आपलं रोखठोक मत मांडलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत फक्त 31.74 टक्के नागरिकांनी मतदान केलं होतं. त्यापैकी साडेबारा हजार नागरिकांनी नोटाचं बटन दाबून मतदान केल्याने याबाबतची सध्या जोरदार चर्चा आहे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं म्हंटल होतं. या विधानावरूनही नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. “मध्यवधी निवडणुका का होतील? कारण काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे की सरकार पडलं आहे? मध्यवधी निवडणुका घ्यायचं नेमकं कारण काय आहे? उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्यायच्या का? असं होत नाही. घरबसल्या बोलायला काय जातं. त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं”, अशी टीकाही नारायण राणे यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.