Narayan Rane | “तर चालणं, बोलणं, फिरणं कठीण होईल” ; सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे शिवसैनिक भिडले. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमिवर सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच 50 शिवसैनिकांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांचा जामीन झाल्यानंतर मातोश्रीवर त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेटल घेतली.

“झालेल्या प्रकरणाबद्दल पोलीस चौकशी करतील. चौकशी करणे पोलिसांचे काम आहे. फायरींग झाल्याचा आरोप करत आहे. फायरींग झाली तर आवाज येतो. शिवसेनेला तक्रार करण्यापलीकडे काही उरलं नाही आहे. मातोश्रीच्या दुकानात बसुन फक्त तक्रारींचे मार्केटींग सुरु आहे. असे हल्ले करु नका, शेवटी महाराष्ट्रात मुंबईत, राहायचं आहे, फिरायचं आहे. परवानग्या घ्याव्या लागतील, असा थेट इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

उद्धव ठाकरेंनी गोळी चालवल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यांचे ५० लोक एका मानसाला मारण्यासाठी घरापर्यंत येतात. त्यावर काय कारवाई होईल, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही या हल्याची दखल घेत नाही, जर दखल घेतली तर चालणं, बोलणं, फिरणं किती कठीण होईल ते, असा इशारा देखील राणेंनी ठाकरेंना दिला. दसरा मेळाव्यावर राणे म्हणाले, खरी शिवसेना शिंदे गट दसरा मेळावा घेतील. पक्षाचे चिन्ह देखील त्यांना मिळणार आहे.

आपण गोळीबार केलेला नाही-

सरवणकर म्हणाले, आपण गोळीबार केलेला नाही, कोणताही गुन्हा केलेला नाही. जाणीवपूर्वक बदनाम करण्याची रणनीती असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. आमदार आहे, शिंदे गटात गेल्यामुळे हे षडयंत्र करण्यात येते आहे. आपल्यासोबत स्टेनगनधारी पोलीस असताना मला पिस्तूल हातात घेण्याची काय गरज आहे, असे मला वाटत नाही.आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पोलिसांवर दबाव आणून कुणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्याचा तपास करतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.

या भागातील आमदार असल्याने हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण कामातून मोठे झालेलो आहोत, भांडणे करुन मोठे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात असे वाद करु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांना मदत करण्यासाठी, त्यांनी चौकशीला बोलावले तर जाऊ असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.