Narayan Rane | ‘नारायण राणे यांची किंमत आजच्या घडीला चाराण्याचीच’

Narayan Rane | मुंबई : भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो आणावे. लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या मनात हा विचार आला, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. व्यापारीही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवतात असा दाखला त्यांनी दिला. नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केली. यानंतर आता राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. अशातच सोशल मीडियातून नारायण राणे यांचा एक व्हायरल झाला आहे.

यानंतर आता सोशल मीडियातून याबाबत मिम्स देखील शेअर केल्या. राजकीय नेत्यांची ही स्पर्धा सुरू असतानाच सोशल मीडियातून काही लोकांमध्ये खोडसाळपणा सुरू आहे. कुणी तरी नाण्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (narayan rane) यांचा फोटो छापावा असं म्हटलं आहे. तसेच राणेंचा फोटो असलेला चलनी नाण्याचा फोटोही व्हायरल केला आहे. या खोडसाळपणावर भाजपमधून (bjp) तीव्र प्रतिक्रिया उमटली असून प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

नारायण राणे यांची किंमत आताच्या घडीला चाराण्याचीच आहे, असं ते म्हणाले आहेत. नारायण राणे यांचा 25 पैशांच्या नाणेवरचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर दानवे यांनी या व्हायरल फोटोचा संदर्भ देत राणेंवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अंबादास दानवे यांनी नारायण राणे यांच्यासोबत अब्दुल सत्तार आणि चंद्रकात पाटील यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी आपल्या मतदारसंघात यावं म्हणून जे आधी वाट बघत होते, आता तेच सत्तार टीका करत असल्याचंही दानवे यांनी म्हटलं.

नेमकी व्हायरल पोस्ट काय होती?

सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत 25 पैशाच्या नाण्यावर नारायण राणे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्यावर, सगळं जाऊ द्या हे फायनल करा. भक्तांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. काहींनी तर हे फायनल करा, भक्तपण खूश, असं लिहिलं आहे. एकाने तर हे फायनल करा. नाही तर रक्ताचे पाट वाहवू, असं म्हटलं आहे. पण हा फोटो नेमका कुणी तयार केला आणि व्हायरल केला याची काहीही माहिती मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.