Narayan Rane | नीलम गोऱ्हे यांच्याबाबत नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
Narayan Rane | मुंबई : भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. डोंबिवलीत नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.
नीलम गोऱ्हे ताी शिवसेना सोडून चालल्या होत्या, मी थांबवलं त्यांना, शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या, असं नारायण राणे म्हणाले. ताई नाराज आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, असा गौप्यस्फोट देखील नारायण राणेंनी केला आहे.
आदित्य ठाकरे हे बालीश असून सावरकरांचा इतिहास त्यांना आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे याना माहिती नाही. त्यामुळे त्यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे गांभीर्य कळले नाही असा, टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. सावरकरांचे देशासाठी योगदान खूप मोठं असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते ते आदित्य ठाकरेंना माहिती नाही, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, हे फक्त त्या यात्रेत फोटो काढण्यासाठी गेले त्यामुळेच त्यांना या वक्तव्याचे गांभीर्य नसल्याने त्यांना कोणतीही चीड आली नाही का, असा खोचक सवाल देखील नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र पसरली गुलाबी थंडी, तर काही ठिकाणी मोसमातील निचांकी तापमानाची नोंद
- Sushma Andhare | “रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ, तर भुमरे…”, सुषमा अंधारे बरसल्या
- Congress | रणजीत सावरकर यांनी पंडित नेहरुंवर केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेत्याचा पलटवार, म्हणाले…
- Ranjeet Savarkar | “एका बाईसाठी पंडित नेहरुंनी देशाची फाळणी केली”, रणजीत सावकरांचा धक्कादायक आरोप
- Narayan Rane | “आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांना…”, नारायण राणेंचा खोचक टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.