Narayan rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Narayan rane | सिंधदुर्ग : आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एक वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद काही नवा नाही. नारायण राणे आंगणेवाडी येथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे.

शिवसेना खरी वाढली कोकणामधून. आम्ही शिवसेनेसाठी कष्ट उपसले. उद्धव ठाकरेंनी काय केलं? असा सवाल उपस्थित करुन राणे म्हणाले की, त्यांनी साधी अंगणवाडी बांधली नाही. कोकणामध्ये आलेल्या प्रत्येक प्रकल्पाला मात्र विरोध केला” असे म्हणत नारायण राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.

“माझ्यावर टीका केली जात आहे. मी सहन करतोय तोपर्यंत ठीकय. एकदा का मी बोलायला लागलो तर सगळंच बाहेर काढेन. त्यांना इथं राहताही येणार नाही. मी भाजपमध्ये आलो हीच अडचण झाली. कारण इथं सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून शांत आहे”, असं वक्तव्य नारायण राणेंनी केल्याने सर्वांनी तोंडात बोटं घातली आहे.

महत्वाच्या बातम्या