Narayan Rane | “मोदींवर टीका करण्याची ‘या’ दोघांची लायकी नाही”; नारायण राणेंकडून सडेतोड प्रत्युत्तर  

Narayan Rane | मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही युतीचीा घोषणा करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही एक दिवस अंत होईल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. यावरून नारायण राणे यांनी या दोन्ही नेत्यांना सुनावलं आहे.

नारायण राणे म्हणाले, “शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना नारायण राणे म्हणाले, मुळात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आबंडेकर याचं अस्तित्वच काय आहे? राज्यात आता शिवशक्ती कुठं राहिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे १२ देखील आमदार राहिले नाहीत.”

“मोदींवर टिका करण्याची या दोघांची लायकी नाही. राज्यात शिवशक्ती तर नाहीच. भीमशक्ति देशात आहे पण प्रकाश आंबेडकरकडे किती आहे? त्यानं किती दलितांची घरं बसवली ? मी सांगतो मी किती जणांची घरं बसवली”, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडी एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असंही नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

ते म्हणाले, ‘ पॉलिटिकल लीडरशिप संपत चालली आहे. ईडीच्या मार्फत या देशातलं पॉलिटिकल लीडरशिप संपवण्याचं काम सुरु आहे. त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला असेल तर केस करा, खटले दाखल करा आणि जेलमध्ये टाका. पण ते न करता लीडरशिपवर आक्षेप घेतला जातोय. हे आजच्या घडीला मोठं धोकादायक आहे. आपण कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाहीत. एक दिवस आपलाही अंत होणार आहे. तसा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातलीही लीडरशिप संपवली आहे. त्यांचे अनेक मंत्री सांगतात. आम्ही फक्त फायली उचलून घेतो.

महत्वाच्या बातम्या :