Narayan Rane | “येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Narayan Rane | मुंबई : राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद हा काही नवा नाही. त्यातच आता कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगल्याचा पहायला मिळत असतो. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Vaibhav Naik Comment on Narayan Rane

“नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार आहे”, असा गौप्यस्फोट वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या वक्तव्यामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

“आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे”, असंही वैभव नाईक म्हणाले आहेत.

“त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला?”

“नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा”, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.