Narayan Rane | “विनायक राऊत यांना पाडण्यासाठी…”, शहाजीबापू पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

Narayan Rane | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडमध्ये सहभागी असलेले आणि आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर बोचरी टीका केली होती. यावरुन आता भाजप नेते नारायण राणे यांनी विनायक राऊत यांना धारेवर धरत शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणे यांची प्रतिक्रिया –

शहाजीबापू जे बोलले ते त्यांच मत होतं, मतावर काय बोलणार? पण विनायक राऊत यांना पाडण्यासाठी फार मोठ्या ताकदीची गरज नाही, ते पडल्यातच जमा असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर आत्महत्या करणाऱ्याला त्याचं वाईट वाटत नसते कारण तो स्वतः आत्महत्या करत असतो. तशीच राजकीय आत्महत्या उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे वाईट वाटण्याचे कारण नाही, असा टोला देखील राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य –

दरम्यान, विनायक राऊत यांना पाडण्यासाठी निलेश राणे यांनी पुढे यावं, 2024 ला आपण मैदानात उतरू असं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं होतं. तसेच नारायण राणे यांच्या जीवनातील संघर्ष, निलेश राणे तुमच्याही जीवनात आणि माझ्याही जीवनात आला नसल्याचं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे, नारायण राणे, एकनाथ शिंदे. एकेकाळी स. का. पाटील हे नाव राजकारणात खूप मोठं होतं. त्याच स.का. पाटलांची सभा जर कोणी उधळली असेल तर त्याचं नाव आहे नारायण राणे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ कोकणात रोवली आणि भगवा झेंडा संपूर्ण कोकणात फिरवला. नारायण राणेंना स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा अनेक वेळा हे काम करावं लागलं, अस देखील शहाजीबापू म्हणाले होते.

आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर, या दोघांसोबतच अजूनही दोघं-तिघं यासाठी कारणीभूत आहेत अशी टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली होती. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं,” असं शहाजीबापू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.