Narayan Rane । 25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो फायनल करा; सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल
Narayan Rane | मुंबई : भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो आणावे. लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या मनात हा विचार आला, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. व्यापारीही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवतात असा दाखला त्यांनी दिला. नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केली. यानंतर आता राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. अशातच सोशल मीडियातून नारायण राणे यांचा एक व्हायरल झाला आहे.
यानंतर आता सोशल मीडियातून याबाबत मिम्स देखील शेअर केल्या. राजकीय नेत्यांची ही स्पर्धा सुरू असतानाच सोशल मीडियातून काही लोकांमध्ये खोडसाळपणा सुरू आहे. कुणी तरी नाण्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (narayan rane) यांचा फोटो छापावा असं म्हटलं आहे. तसेच राणेंचा फोटो असलेला चलनी नाण्याचा फोटोही व्हायरल केला आहे. या खोडसाळपणावर भाजपमधून (bjp) तीव्र प्रतिक्रिया उमटली असून प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे.
नेमकी व्हायरल पोस्ट काय होती?
सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत 25 पैशाच्या नाण्यावर नारायण राणे यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्यावर, सगळं जाऊ द्या हे फायनल करा. भक्तांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. काहींनी तर हे फायनल करा, भक्तपण खूश, असं लिहिलं आहे. एकाने तर हे फायनल करा. नाही तर रक्ताचे पाट वाहवू, असं म्हटलं आहे. पण हा फोटो नेमका कुणी तयार केला आणि व्हायरल केला याची काहीही माहिती मिळालेली नाही.
मनसेची प्रतिक्रिया –
आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. पायाभूत सुविधांवर भर देण्याची विनंती राजू पाटील यांनी केली आहे. सध्याचं राजकारण पाहून जनता NOTA वापरायच्या मुडमध्ये आहे. त्यामुळे महागाई कमी करा. शेतकरी बांधवांना दिलासा द्या. रस्ते चांगले करा. चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा. रूपया मजबूत करा. उगीचच कशाला त्या नोटा आणि फोटोंच्या मागे लागलाय? सामान्यांना याचा काय फायदा? फालतू राजकारण, असं राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | “मला त्रास दिला तर…”; एकनाथ खडसेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
- PAK vs ZIM : पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर केली ‘चिटिंग’, तरीही झाला लाजिरवाणा पराभव, हा घ्या पुरावा
- Realme Launch | पुढच्या महिन्यात Realme ची ‘हि’ सीरिज होणार लाँच
- Rituja Latke । ऋतुजा लटके यांच्या अडचणी वाढणार?, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Chandrakant Khaire | आदित्य ठाकरेंना ‘छोटा पप्पू’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.