Narayan Rane | “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये…”; नारायण राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका

Narayan Rane | पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही काम धंदा नाही. तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोघेही डिप्रेशनमध्ये आहे, या शब्दात नारायण राणेंनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

“मोदी सरकार दहा लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध देणार आहे. मोदी सरकारने आतापर्यंत रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तीन लाख नोकऱ्या दिल्या आहेत. ज्या माणसाने अडीच वर्षात एकही नोकरीची संधी उपलब्ध करून दिली नाही त्याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत करू नये, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “16 आमदारांच्या अपात्रतेवरून पोपट हा शब्द राजकीय वर्तुळात चर्चेत आला. संजय राऊत यांना काही काम धंदा नाही. शिवसेनेचा पोपट मातोश्रीवर होता तोपर्यंत ठीक होतं. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये आहे.”

“आपल्याला महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे येता माहिती आहे का? राज्यामध्ये अनेक परदेशी उद्योग येतात. मग बारसूतील प्रकल्पाला विरोध का? कोळसा प्रकल्प मालक उद्धव ठाकरे यांना भेटले होते. बारसूला सुपारी घेऊन विरोध केला जात आहे,” असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या