‘जिकंलास खरं पण तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं, मी अंघोळ करता करता थांबलो’

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे आतापर्यंत 11 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. या विजयावर अखेर नारायण राणेंनी विजयी झालेल्या नेत्यांशी गप्पा मारल्या.

तसेच या निवडणूकीत शिवसेनेचे सतीश सावंत आणि भाजपचे विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर चिठ्ठी टाकून देसाई यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे. विद्यमान अध्यक्षांचा पराभव झाल्याने शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. यावरूनच आता नारायण राणे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

यावेळी राणेंनी विठ्ठल देसाई यांनी चिमटा काढला आहे. जिकंलास ,खरं वाटतंय का? असा प्रश्न नारायण राणेंनी विठ्ठल देसाई यांना विचारला. यावेळी पुढे बोलताना नशीब ए हा नशिब, चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठं नशिब, तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी अंघोळ करता करता थांबलो, असं वक्तव्य नारायण राणेंनी यावेळी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या