InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘राणेंनी माझ्या मुलाला वाचवा असं म्हणत फोन केला होता’

मुंबई-गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकल्यानंतर नितेश राणे यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी शेडेकर यांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभं असल्याचं दिसून येतं. खुनाचा प्रयत्न असं कलम लावा असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचं सांगितलं. तसंच राणेंनी माझ्या मुलाला वाचवा असं म्हणत फोन केला होता. मात्र, आपण ठामपणे नाही म्हटल्याचं पाटील यांनी शेडेंकर कुटुंबीयाना सांगितलं.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी म्हणजेच 4 जुलैला नितेश राणे यांनी उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी त्यांना कणकवली न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply