“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; संजय राऊतांचा राणेंना टोला

मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेवर नेहमी टीका करत असताना पाहायला मिळत असतात. कोकणातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्यव्य केलं होतं. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलचं उत्तर दिलं आहे.

“राज्य सरकारची लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत”, अशा म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्याचा माध्यमांशी बोलत असताना चांगलाच समाचार घेतला आहे.

“संसदेत अनेक खासदार येतात पण शिवसेनेच्या खासदारांची वेगळी ओळख असते. शिवसेना सोडुन गेलेल्या खासदारालाही शिवसैनिक म्हणुनच लोक ओळखतात. नारायण राणे आमका असं न म्हणता, तो शिवसैनिक आहे, असं म्हटलं जातं, असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणेंना टोला लगावत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा