“नारायण राणेच पांढऱ्या पायाचे म्हणून कोकणावर संकट आलं”; शिवसेनेची जहरी टीका

जळगाव : मुसळधार पाऊसमुळे कोकण, रायगड, सातारा, कोल्हापूर याठिकाणी महापूर आणि दरड कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्तहाणी झाली आहे. मात्र यातही राजकरणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चिपळूण दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. आता राणेंच्या टीकेला आता शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“सध्या महाराष्ट्रावर मोठं संकट आहे. या बिकट परिस्थितीत राजकारण करायला नको. राज्यावरील संकटाबाबत बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांना पांढऱ्या पायाचे म्हटलं होतं. परंतु राणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत,” अशी टीका पाटील यांनी केली आहे.

“राजकारणच करायचे असेल तर त्यासाठी खूप आराखडे आहेत. वेळ आल्यावर प्रत्येकाने आपापला झेंडा घेऊन उतरा. मात्र, अशा परिस्थितीत राजकारण करणे योग्य नाही,” असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा