‘नारायण राणे नारळावरील कुस्ती जिंकले, मात्र आव हिंदकेसरी जिंकल्याचा’
सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे आतापर्यंत 11 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. या विजयावर अखेर नारायण राणेंनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली होती.
पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या हातात जिल्हा बँक आलेली आहे. आता आमचे पुढचे लक्ष महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असावा याकडे राहणार आहे. आता आमचं टार्गेट महाराष्ट्र सरकार, असं म्हणत नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान होत.
यानंतर नारायण राणेंनी वाघाच्या शेपटाला पकडलंय आणि त्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत जाण्यापासून रोखतात, असे कार्टून प्रसिद्ध झाले आहे. याविषयी राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना विचारले असता त्यांनी राणेंवर जोरदार प्रहार केलाय. यावेळी राज्य सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यात व जिल्ह्यात राबविलेल्या महत्त्वाच्या योजना व निर्णयांची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना टीका केलीय.
देसाई म्हणाले कि, गावाकडे नारळावरील किंवा बत्ताश्यावरील कुस्ती असते. त्याप्रमाणे नारळावरील कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरीला लढत दिली असे सांगायचे हे नारायण राणे यांचे केविलवाणे प्रयत्न आहेत,अशी घणाघाती टीका त्यांनी केलीय. मुळात जिल्हा बँकेची निवडणूक ही मर्यादित मतदारांची असते. त्यांनी सार्वजनिक निवडणुकीसाठी पुढे यावे, त्यांना कोकणातील व सिंधुदुर्गची शिवसेना काय आहे, हे तेथील शिवसैनिक व जनताच आगामी निवडणुकीत दाखवून देईल, असे प्रत्युत्तर दिले.
महत्वाच्या बातम्या
- “शिवसेनेचा हा सक्षम नेता हे राज्य चालवू शकतो, पण…”, रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
- … तर या गोष्टी बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल; राजेश टोपेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा
- संजय राऊत काय बोलतात हे मी गंभीरपणे घेत नाही; सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार
- शपथनामा हर्बल वनस्पती घेऊन लिहिला नाही ना?, सुधीर मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
- राज्यातील महाविद्यालये सुरु राहणार कि बंद ?, यावर उदय सामंतांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
You must log in to post a comment.